अभिप्राय

"गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,हा चालवू आम्ही वारसा" हा संदेश आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपणाकडून पोहचविला जात आहे.

LBSH माजी विद्यार्थी मंच ची स्थापना, नंतर भव्यदिव्य स्नेहमेळावा व मी याच शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून त्यामध्ये सहभागी होतो.एकूनच नियोजन खुप छान होतं त्यामुळे सर्वांना खुपच आनंद झाला.त्यानंतर मंचने शैक्षणिक,क्रिडा,सांक्रुतिक,आरोग्य व सामाजिक असे स्तुत्य उपक्रम राबवून सर्वांगीन विकास व्हावा यासाठी पाऊल उचलले आहे.त्यामधे मागील दोन वर्षा पासुन गरजू विद्यार्थी गणवेश वाटप, स्कुल बँग व शैक्षणिक साहित्य वाटप, दहावी विद्यार्थी मार्गदर्शन असे उपक्रम चालू आहेत.

तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांस क्रिडा क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी यासाठी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन उत्तम कामगिरी बजावली आहे. शाळेची भौतीक गरज ओळखून एस.एस.सी. ८७/८८ बँच ने एक खुले सभाग्रह बांधुन दिले आहे.मुंबई येथील नानावटी रुग्णालयाचे तज्ञ डाँक्टरांचे हस्ते पंचक्रोशीतील गरजू रुग्नांना वैद्यकिय आरोग्य शिबीराचे आयोजन करूण मोफत सेवा उपलब्ध करून 'आरोग्य हिच खरी संपत्ती ' असा विचार दिला आहे.

अश्याच प्रकारे व्रक्षारोपन,जलसंधारण,अंधश्रद्धा निर्मुलन,स्वच्छता अभियान,अंध-अपंग मदत असे शैक्षणिक,सामाजिक उपक्रम मंचने राबवावेत व ते आपणाकडुन राबविले जातील. अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.LBSH मंच च्या द्वितीय वर्धापण दिनानिमित्त आयोजिलेल्या 'वेबसाईट अनावरण सोहळा' च्या व पुढील यशस्वी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा !

गायकवाड अनंत काशीनाथ (BA,B.E.D, B.S.M)
मुख्याध्यापक व माजी विद्यार्थी
लाल बहादुर शास्त्री हायस्कूल- दहागांव