गुरुपौर्णिमा

आज गुरुपौर्णिमा, जिवन प्रवासात लाभलेल्या समस्त गुरुजनांना वंदन करण्याचा शुभ दिवस. गुरु आपल्या विद्यारुपी प्रकाशमय दिव्याला लाभलेली प्रखर प्रभाच जणू.

गुरु-शिष्य नात्याचे पुष्कळ असे पैलू माझ्या शालेय जीवनात दिसून आले. प्रथमतः मी माननीय अभंग सरांचा उल्लेख करेन.

शिस्तबद्ध शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्जनाची सवय त्यानीच विद्यार्थ्यांना शिकवली. इंग्रजी सारखा भयावह वाटणारा विषय माननीय अभंग सरांनी सहज सोपा करून दाखवला.

दुसरे नाव माननीय खोचरे सरांचे घेवू ईच्छीतो. अभ्यासाबरोबरच शालेय जीवनात सामान्य ज्ञानाचे महत्त्व माननीय खोचरे सरांनी पटवून दिले. त्यांची जबरदस्त भेदक नजर विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध राहण्यास प्रवृत्त करी. मराठी भाषेत व्याकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व खोचरे सरांनी दाखवून दिले.

तिसरे नाव माननीय देवकर सरांचे घेतो, नीटनेटके राहणीमान आणि सुवाच्य अक्षराचा ठेवा माननीय देवकर सरांनी दिला. चौथे नाव माननीय डहाळे सरांचे घेईन. शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये मैत्रीपूर्ण नातेसंबंधांची सांगड माननीय डहाळे सरांनी घातली.

पाचवे नाव माननीय अभंग बाईं चे घेवू ईच्छीतो. त्यांनी शाळेत आर.डी. सारखे उपक्रम राबवून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना काटकसर आणि बचतीचे महत्त्व पटवून दिले. सहावे नाव माननीय पाटणकर सरांचे घेईन. त्यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली. सातवे नाव माननीय वाडकर सरांचे घेवू ईच्छीतो. त्यांनी हिंदी सारख्या सर्वत्र उपयोगी अशा भाषेची गोडी लावली.

आठवे नाव माननीय कवठेकर सरांचे घेईन. त्यांनी आम्हास साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आत्मसात करावयाची शिकवण दिली आणि ते स्वतः त्याचप्रमाणे वागत असत. नववे नाव माननीय चव्हाण सरांचे घेतो.

अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्याच्या नवनवीन युक्त्या त्यानीच आम्हाला शिकवल्या व त्या रोजच्या जीवनात खूप उपयोगी ठरल्या. आणि दहावे नाव माननीय *जोगदंडे* सरांचे घेवू ईच्छीतो. इतिहासासारख्या किचकट विषयाला गोष्टीरुप देवून विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा एकमेव शिक्षक म्हणजे आमचे जोगदंडे सर.

अशा अनमोल दहा रत्नांना गुरुपौर्णिमेनिमित्त एका माजी विद्यार्थ्याचा मानाचा मुजरा............w