दिवाळी सण विशेष

ती लहनपणीची माझ्या गावची ती दिवाळी डोळ्यासमोर उभी राहिली....आताची दिवाळी साजरी करताना होणारी दमछाक आठवली, टेन्शन ती आनंद मिळवण्यासाठी !! गावची दिवाळी...

सुरुवात व्हायची ती "पोहे" या पदार्थ पासून. आदल्या दिवशी गरम पाण्यात बुडवून भात ठेवला जाई, मग तो चक्की वर जाई. असंख्य बाया,पुरुष, मुलं डोक्यावर टोपली घेऊन, श्री.गोविंदशेठ गांधी यांच्या चक्कीकडे जाई. हि लगबग सुरु झाली की दिवाळीच वातावरण तयार होई. दिवस -रात्र चक्की अविरतपणे चालू... गरम गरम पोहे चक्की वरून येतानाच पोटात जात, तो सुवास... तो पहिला घास तृप्त करून जायचा. तिथे रांगोळीचा जो ढीग असे त्यातून अंगणातील रांगोळी, तशी हि रांगोळी बहुगुणी, प्रसंगी दात सुद्धा घासले जात. दिवाळी म्हणजे, प्रत्येक घरात होणारी "बोरं" हा सर्वमान्य पदार्थ! मग पुढील पदार्थ हे ऐपतीप्रमाणे. पण त्यात "कळ्या" हा गोड पदार्थ असणार. चकली, शंकर पाळी, करंजी, लाडू ! बोरांच्या बरोबर यातील एखादा दुसरा. पेपर च्या पुढीत शेजारी पाजारी वाटून झल्यावर, त्याच्याकडून काही वेगळं आलय का?......

भातशेती कापलेली, दिवाळीत हे मोठं कामं! सगळीकडे लगबग, बंद तयार करण्यापासून ते खळे तयार कारण्यापरियांतची कामं. ती उडवी पाहण्यात वेगळं सुख! पाऊस पाण्यातून ती पीक ओंजळीत यायचं, आपले कष्ट करणारे "आईवडील" सुखवाचे! लोक न सांगता हि एकमेकांच्या मदतीला धावले, बांधावर भाकरी पासून जेवणाची पंगत पडायची, ... चार घास जास्त जायचे!

आताच्या "हायज्यांनीक" attitude ला फाट्यावर मारून सगळं कसं साग्रसंगीत जेवण! पुन्हा डोक्यावर तो "भारा" घेऊन मोहीम...सुरु!! आणि भव्य उडवी आकार घेई! सगळी मेहनत आकाराला येई. कापलेल्या शेतातून "लोम्ब्या" गोळा करून दुकानातून फटाके आणले जायचे ....कोण आनंद मिळायचा, त्यांचा आवाज न कानठळ्या बसवायचा, न प्रदूषण! कारण त्यात निर्मळ आनंद, समाधान....

संध्याकाळी त्याच कराट्टूच्या पणत्या...तेजोमय! रानातून आलेले तवस्या, चिबुड, चवळी शेंगा, तुरीच्या शेंगा, आवळे, चिंच....हे शोधण्यासाठी अगदी अनवाणी, ब्रँड चा जमाना, अस्तित्वात यायचा होता.क्रिकेट!

मोकळ्या शेतात खेळपट्टी आणि मग 5 ते 10 रुपयांची म्याच! क्या स्पोर्ट था यार! चिडाचीड-मारामारी-हमरातुमरी! बहुत देर के बाद निर्णय! मग दिवसभर ती चर्चा! .......आर पळ... पला...रेडा उधळला! झोम्बी! बापरे, किती दिवस त्याची चर्चा! दोन माजलेले रेडे आणि गावागातून आलेली प्रेक्षक! हि गर्दी! चर्चेला उधाण! अशी होती त्या वेळची" दिवाळी पहाट" आता ...... भाऊबीज ! बहिणीला त्या वेळी काय देणार?? फार विशेष प्लानिंग नसायचं, गिफ्ट काय घेणार...हि संकल्पना नव्हती. आईवडील हातात जे पाच -दहा द्यायचे ती ओवाळणी. पण तीचं ओवाळणी...मोठा झल्यावर दे! तिच्या ओवळणीसाठी सकाळ पासून ओढ लागायची दिवलागणीला ती ओवाळणीसाठी सज्ज! छान ....

व्हायची ती भाऊबीज ना कुठल्या किमतीच्या, गिफ्ट ची गरज... ना गिफ्टशॉपची. आज फार लांब आहोत..... पण ती भाऊबीज हृदयाच्या खूपच जवळ आहे! बरं.. गणपतीत दिलेले कपडे दिवाळीत तरी मिळतील, तर आपेक्षा भंग ठरलेला... मांडवकर आणि सम्मद! हे विख्यात टेलर. त्यांच्या सवडी प्रमाणे द्यायचे...त्यात मांडवकर परवडले...शिवलेले असायचे, बटणं लावायचे बाकी, पण सम्मद... तू दिले होतेस? इथून सुरवात......मग ते होळीला मिळायचे. तेंव्हा हि बटणं लावायची बाकि असत...त्या मुळे ते कापड सगळे सण त्याच्याच घरी साजरे करत...

मग केंव तरी पहाटे.... हा देई.त्याला समस्त कुटुंब धन्यवाद म्हणे....काय करणार! कारण ते नवीन कपडे हि दुर्मिळ होते. एक प्रश्न नेहमी पडायचा, दिवाळीत अभ्यास का द्यायचे, ती प्रश्नपत्रिका सोडवायला! ते द्यायचे, पण खुंटीला अडकवले दप्तर हे शाळेला जायच्या दिवशीच खाली यायचं. बाकी मुलं सुटी लागली की लगेच अभ्यास संपवायचे... आम्ही मात्र एक दोन सोडून... ओळीने मार खायचो!

एका दिवसात मर मर मार खायचा, पण 20 दिवस आनंदात गेलेलं असायचे ..त्या मुळे हा हिशोब पटायचा.दिवाळी संपायची ती...तुळशीचं लग्न आणि त्रिपुरारी पौर्णिमा या उत्सवानंतर. एवढी मोठी दिवाळी, आता मात्र 5 दिवसात संपते....जगणं बदललंय! आता सेलिब्रेशन च टेन्शन येतंय, घेतोय! प्लानिंग मध्ये जीव अडकलाय बजेट मध्ये चढउतार आलेत.खरेदी करायची .....त्या साठी भली मोठी लाईन! आनंदाच हि सालं टेन्शन येतं अपेक्षापूर्ती च टेन्शन!

स्टेटस ची दिवाळी झालीये....केलीये! आनंद...समाधान देणारी दिवाळी काळाच्या चक्रात ....दिसणाऱ्या धुरात... हरवत चाललीये का?? आनंद! समाधान विकत घेतोय! तरी ते साल महाग!.....

आता मात्र कळतंय कि किती अमूल्य होत ते...सगळेच.ती दिवाळी! दिवाळीच्या शुभेच्छा कोणी देत फिरत नव्हतं... तर तो आसमंत, ते वातावरण...निसर्ग .. ती माणसं स्वतःहुन घेऊन येत ...! छान होत सगळं!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!